सध्या देशात हवामानात बदल होत आहे. काही राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातून दमट वारे वाहत आहे या मुळे हवामानात बदल होत आहे. देशातील काही भागात ढगाळ वातावरण असून काही भागात थंडीचा प्रकोप कमी झाला असे दिसून येत आहे. येत्या 24 तासांत वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल आणि काही राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
येत्या 48 तासांत चंदीगड, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानच्या काही भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पश्चिम मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात मुसळधार पावसांसह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच पुढील पाच दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील काही भागात आज रविवारी मेघसरी कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या
केरळ मध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Edited By- Priya Dixit