Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

१३ जानेवारीपर्यंत गारपिटीसह पावसाची शक्यता

१३ जानेवारीपर्यंत गारपिटीसह पावसाची शक्यता
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (07:46 IST)
राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पुढील तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह गारपिट आणि पावसाची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला असून मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची देखील शक्यता आहे.
आज देखील विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. भंडारा, चंद्रपूरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. तसेच नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. नागपूरकरांना सूर्याचं दर्शन देखील झालं नाही.
आता येत्या १३ जानेवारीपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तसेच इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदडे, तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
११ ते १३ जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.पावसाबरोबरच नागरिकांना कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागणार आहे. कारण, मध्य महाराष्ट्रात तापमान २-३ अंश घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे तर बाळासाहेब विखे पाटलांच्या लढ्याचे यश- विखे पाटील