Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट

Rain alert with thunderstorms in the state राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट Marathi Regional News In Webdunia Marathi
, शनिवार, 8 जानेवारी 2022 (17:03 IST)
राज्याच्या काही भागांत 7 ते 10 जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस, तर विदर्भात काही भागांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आह़े. राज्यात थंडीने तूर्त विश्रांती घेतली असून, रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. रात्री हलका गारवा असला, तरी कोणत्याही भागांत कडाक्याची थंडी नाही. अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीखाली आले आहे. 10 जानेवारीपर्यंत रात्रीच्या तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. याच कालावधीत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
 
मुंबईत सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याचं दिसून येत असताना सकाळी 10 ते 11 च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पश्चिम उपनगरात अंधेरी गोरेगाव, कुर्ल्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी तर पावसानं जोरदार हजेरी लावली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीपी, आरोग्य : लसूण, बीट आणि कलिंगड खाऊन रक्तदाब नियंत्रणात राहातो का?