राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्येही पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहेत. तर हवामान खात्याप्रमाणे पुढील तीन- चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने कोकण, गोवा, किनारपट्टी येथे पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसत आहे. हवामान खात्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील आणि पावसाची काही चिन्हे नाहीत.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार कोकणामध्येही पावसाचा इशारा आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने 24 आणि 25 तारखेला यलो अलर्ट दिला आहे.