कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवरून नव्या वादाला सुरवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीने गोपनीय रित्या आंबाबई देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया केल्याचे समोर आलंय. दरम्यान अंबाबाई देवीच्या मूर्तीवर गोपनीय रित्या रासायनिक संवर्धन केल्याप्रकरणी शिवसैनिक पुन्हा एकदा देवस्थान समितीला जाब विचारत आहे.
प्रशासनाने देवीचे रासायनिक संवर्धन करताना कोणालाच का कल्पना दिली नाही? त्यावरून शिवसेना आक्रमक झाली असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना फैलावर घेतले. तुम्ही तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी शिवसेनेने केली.
अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत नव्हती तर मग याची कल्पना भक्तांना का दिली नाही ? रासायनिक संवर्धन प्रक्रिया करायची होती तर रात्रीच्या अंधारात सीसीटीव्ही बंद करून रासायनिक संवर्धन प्रक्रिया का केली गेली ? असे अनेक प्रश्न शिवसैनिक देवस्थान समितीला पुन्हा एकदा विचारणार आहेत.