Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 8 March 2025
webdunia

कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार

aare carshed
, शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (15:26 IST)
‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबरच्या संदर्भ सूचित आरे कारशेड प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे वसाहतीत कारशेडसाठी झाडे तोडून पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यानंतर  पर्यावरणप्रेमींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी आणि आता दाखल झालेल्या एकूण सात याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात येत आहे.
 
दरम्यान, न्यायालयाने आरेतील झाडे तोंडण्यास सक्त मनाई केली आहे. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी झाली नाही. न्यायालयाने सुनावणी २७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुसऱ्यांदा नवीनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटजारी