Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुसऱ्यांदा नवीनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटजारी

navneet rana
, शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (15:24 IST)
अमरावतीच्या खासदार नवनीत राणायांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसऱ्यांदा नवीनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटजारी करण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणी राणा हा वॉरंट जारी करण्यात आला आहे.
 
खासदार नवनीत राणाआणि वडील हरभजन सिंह यांच्या विरोधात दोन महिन्यात दोनवेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जात प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि वडील हरभजन सिंह यांच्या विरोधात मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
राणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडील देखील या प्रकरणात आरोपी आहेत. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले, सांगितले वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो