Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला

rohit panwar
, शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:45 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील ट्वटीद्वार शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की “सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या ७६ हजार कोटींच्या धोरणात केंद्र सरकारने अनेक बदल केले असून मर्यादित असलेल्या अनुदानाच्या रकमा वाढविण्याचा अत्यंत महत्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय घेतला.”
 
याचबरोबर “एकीकडं सेमीकंडक्टर उद्योगाला चालना मिळत असल्याचा आनंद आहे पण दुसरीकडं वेदांत महाराष्ट्रातून गेल्याचं दुःख आहे. महाराष्ट्र सरकारने देऊ केलेल्या सवलती गुजरातपेक्षा ११ हजार कोटींनी जास्त होत्या तरीही वेदान्त गुजरातला का गेला? हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न होता.या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारच्या सुधारित सेमीकंडक्टर धोरणात मिळत आहे. मविआ सरकार सवलती देण्यात कमी पडलं नाही तर सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही.” असं म्हणत रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील