Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर मध्ये महिलांकडून समाज सेवकाला मारहाण

छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर मध्ये महिलांकडून समाज सेवकाला मारहाण
, बुधवार, 26 जुलै 2023 (11:51 IST)
social media
छत्रपती संभाजी नगर तालुका कन्नड येथे मंगळवारी दुपारी काही महिलांकडून एका समाज सेवकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जातीवाचक शिवीगाळ करण्याचा आरोपावरून काही महिलांनी समाजसेवकाला चांगलेच बदडले आहे. 
 
काय आहे हे प्रकरण- 
शासकीय योजनांमध्ये महिलेने कागदपत्रावर पतीला मृत दाखविल्याचा जाब या महिलेने विचारल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. असा आरोप महिलेने केला. या वरून काही महिलांच्या जमावाने संतप्त होऊन सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओ मध्ये तीन महिला एका व्यक्तीला भररस्त्यावर फिरवत त्याला मारहाण करत आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या केमेऱ्यात  कैद झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
या प्रकरणी कन्नड पोलिसांनी दोन्ही पक्षाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची दोन्ही बाजूने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Team India Schedule: विश्वचषकापूर्वी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार, पुढील वर्षीपर्यंत पूर्ण वेळापत्रक जाहीर