Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटी रवाना

eknath shinde
, शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (10:40 IST)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीला रवाना झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेसाठी गुवाहाटीला जात आहेव. या मागे आमचा कोणताही दुसरा हेतू नाही. सीएम शिंदे काही आमदारांसह सकाळी 10 वाजता रवाना  झाले असून ते तिथे कामाख्यादेवीचे दर्शन घेणार.काही आमदार आपल्या वैयक्तिक कारणास्तव जात नसल्याचे वृत्त आहे. तर काही नाराज असल्यामुळे जात नाही. 
 
आसामच्या मुख्यमंत्रीनी सीएम शिंदे यांना गुवाहाटी येण्याचं आमंत्रण दिले. देवी कामाख्याकडे राज्यातील जनतेला आणि बळीराजाला सुख मिळावं, राज्यात सौख्य आणि शांती नांदो हे मागणे मागण्यासाठी देवीच्या दर्शनाला जात असल्याचं मुख्यमंत्रीनी सांगितले. देवीला मागितलेली इच्छा देवीने पूर्ण केली त्यासाठी देवीच्या दर्शनाला जात आहोत. 
 
देवीची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कामाख्या देवी ही तांत्रिक- मांत्रिकसाठी महत्त्वाची देवी आहे. भाविकांनी मागितलेले कोणतेही नवस इथे पूर्ण होत असल्याचे म्हटले जाते. कामाख्या देवीला भगवान शंकराच्या नववधुरुपात पुजले जाते. कामाख्या देवी नवसाला पूर्ण करणारी देवी म्हणून ओळखली जाते. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2002 साली दंगेखोरांना ‘धडा शिकवला’- अमित शाह