Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापुरात शिंदे गट राष्ट्रवादीला पहिला धक्का ! जिल्हाध्यक्ष शिंदे गटात

eknath shinde
, शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (08:39 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ए. वाय. पाटील (A. Y. Patil) हे गेल्या काही दिसावसांपासून पक्षावर नाराज असल्याने ते शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. यावेळी कणेरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या ‘सुमंगलम’ महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमादरम्यान ए. वाय. पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर दिसले. त्यामुळे ए. वाय. पाटील शिंदे गटात प्रवेश करणार अशा राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. तसेच सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर होत असलेल्या ‘सुमंगलम’ महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण कार्यक्रमात व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून तटस्थ भूमिका घेतलेले करवीरचे माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके सुद्धा व्यासपीठावर दिसले. याआधीही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहे. तेव्हपासून नरके शिंदे गटात जाणार याची चर्चा होती. मात्र, ए. वाय. पाटील व्यासपीठावरून दिसून आल्याने जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत वेळोवेळी अपमान झाल्याची भूमिका पाटील यांनी बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा भावना बोलून दाखवली होती.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश