Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ यांना अतिवृष्टीच्या पार्शवभूमीवर सूचना दिल्या

eknath shinde
, रविवार, 21 जुलै 2024 (17:10 IST)
राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांत अति पावसाचा इशारा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस आणि विविध स्वराज्य संस्थांनी सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहे. 
सर्व प्रशासनाने सतर्क राहावे आणि हवामान खात्याकडून वेळोवेळी परिस्थितीची माहिती मिळवावी. त्यानुसार कार्याचे व्यवस्थापन करावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे. 
 
दुर्घटना संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचण्या द्यावा. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांनी उच्च स्तरावरील तयारी करावी. पुराचा धोका निर्माण होऊ नये या साठी पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध ठेवा. पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याक्षेत्रातील वाहतूक बंद करून योग्य मार्गावर वळवावी. पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, वस्त्र ,औषधें उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्याचे ठिकाणी उपलब्ध करून ठेवावे. 

नागरिकांना कोणत्याही प्रकाराची अडचण किंवा त्रास होऊ नये. याची पुरेपूर काळजी घ्यावी. अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.   
 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लिहून ठेवा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार - देवेंद्र फडणवीस