एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना घेऊन आता नवीन गट केल्याचे समजले आहे. त्यांनी या गटाचे नाव 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे'असे ठेवले आहे. या वर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले असून त्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्ला बोल केला असून त्यांच्यावर निशाणा साधत म्हटले की , बाळासाहेबांचं नाव दुसऱ्यांना वापरता येणार नाही, हिम्मत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागावे.
राज्यात जी काही परिस्थिती आहे त्याला भाजप कारणीभूत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले, आज शिवसेना कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीत राज्यात शिवसेना संपविण्याचा डाव भाजपचा असल्याचं म्हटले. बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतेपद काढण्याची मागणी केली असल्याचे समजले आहे.
या बैठकीत सहा ठराव मंजूर करण्यात आले . संजय राऊत म्हणाले की , शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहतील.