Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना Omicron व्हेरियंट बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची बैठक, शाळा सुरू होणार की नवीन निर्बंध लादणार?

कोरोना Omicron व्हेरियंट बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महत्त्वाची बैठक, शाळा सुरू होणार की नवीन निर्बंध लादणार?
, सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (09:44 IST)
1 डिसेंबरपासून पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. मात्र शेवटच्या क्षणी जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटतून एक नवा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आज शाळा सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवतात का, हे ठरणार आहे. राज्यात नवीन निर्बंध लादले जाण्याची किंवा सध्या सुरू असलेले निर्बंध आणखी कडक होण्याचे संकेत मिळत आहेत.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ने (Covid 19 new strain of south africa) जगभरातील लोकांची झोप उडवली आहे. याला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. भारतातही केंद्र सरकारने राज्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. Omicron variants (Omicron variant) या नव्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  महत्त्वाची बैठक घेणार आहे.  
 
राज्य सरकार 1डिसेंबरपासून पहिली ते चवथी पर्यंतच्या शाळा सुरू करणार आहे. जिथे सातव्या इयत्तेपर्यंत शाळा अजूनही बंद आहेत, तिथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा प्रस्ताव ठेवला होता, त्याला आरोग्य विभागाने हिरवा झेंडा दिला आहे. आता केवळ निर्णयावर मुख्यमंत्र्यांची शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. मात्र शेवटच्या क्षणी जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट तून एक नवा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री आज शाळा सुरू करण्याचा निर्णय कायम ठेवतात की तो मागे घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं वागणार : दरेकर