Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

बालकांचे अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर केले प्रसारीत, २५ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Child pornographic videos spread on social media
, शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (08:06 IST)
नाशिकमध्ये बालकांचे अश्लिल व्हिडीओ व्हॅाटसअप,फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल माध्यमाद्वारे इतरांना प्रसारीत केल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात २५ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सायबर सेलकडून सीडी प्राप्त झाली असून यामध्ये नाशिकच्या २५ जणांनी मे २०१८ ते जानेवारी २०२१ दरम्यान बंदी असतानाही वरिल सोशल साईडवर बालकांचे अश्‍लिल व्हिडीओ इतरांना प्रसारीत केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान कायदा २०० चे कलम ६७ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरज बिजली करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लतादीदींच्या शिवाजी पार्कातील स्मारकाचा वाद थांबवा – ह्दयनाथ मंगेशकर