Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील चित्रपट गृहे, नाट्य गृहे, आजपासून प्रेक्षकांसाठी सुरु होणार

राज्यातील चित्रपट गृहे, नाट्य गृहे, आजपासून प्रेक्षकांसाठी सुरु होणार
, शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (10:04 IST)
कोरोनाकाळात राज्यातील  चित्रपट गृहे आणि नाट्य गृहे बंद करण्यात आली होती.कोरोनाचा वेग आता मंदावला असून सर्व सामान्य जीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने आता हळू हळू कोरोनासाठी लाववण्यात आलेली निर्बंध कमी करण्यास सुरु केली आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आता महाविद्यालय , शाळा, कार्यालये, हॉटेल, प्रेक्षणीय स्थळे लोकल ट्रेन सुरु केले आहे. तसेच राज्यात आज पासून चित्रपट गृहे आणि नाट्य गृहे प्रेक्षकांसाठी सुरु करण्यात आले आहे. तसेच अम्युझमेंट पार्क देखील आज पासून सूरू होत आहे. या साठी राज्यसरकार ने काही नियम जाहीर केले आहेत. प्रत्येकाने त्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या अनुषंगाने काय आहे हे नियम जाणून घेऊ या.
नियम-
* 50 टक्के च्या क्षमतेने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु.
* चित्रपटगृहात आणि नाट्यगृहात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यानाचं प्रवेश मिळणार. 
 * प्रत्येकाने मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे आणि सेनेटाईझरचा वापर करणे बंधनकारक आहे.
*  नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Alec Baldwin : सिनेमाच्या शुटिंगच्यावेळेस सुटली गोळी, महिलेचा मृत्यू