Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचं वीज कनेक्शन कापलं जाणार

वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचं वीज कनेक्शन कापलं जाणार
, गुरूवार, 11 मार्च 2021 (08:34 IST)
अधिवेशन संपताना राज्यातील वीज ग्राहकांना मोठा झटका लागला आहे. ऊर्जामंत्री यांनी वीज कनेक्शन तोडण्याबाबत जी स्थगिती देण्यात आली होती. ती मागे घेतली आहे. याचा अर्थ आता वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचं वीज कनेक्शन कापलं जाणार आहे.
 
2 मार्च 2021 रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत महावितरणाव्दारे वीज ग्राहकांची जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या आधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले आहे.
 
कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर या दरम्यान लोकांना भरमसाठ बिलं आली होती.  लोकांना सरासरीवर आधारीत वीज देयके देण्यात आली होती. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात बिलं आल्याने राज्यातील जनतेने आक्रोश व्यक्त केला होता. वीज बिलमध्ये सवलत बाबत घोषणा करुन नितीन राऊत यांनी युटर्न घेतला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशी आहे कोरोना रूग्णांची वर्गवारी, ९०% रुग्ण रहिवाशी इमारतींमध्ये तर फक्त १०% रुग्ण झोपडपट्टीतले