नागपुरातील चार मंदिरांमध्ये आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, बृहस्पती मंदिर, कोन्होलीबारा आणि दुर्गामाता मंदिर हिलटॉप या मंदिरांचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे जे भाविक अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करून येतील त्यांना मंदिर समितीकडून ओढणी अथवा अंग झाकता येईल, असं वस्त्र दिलं जाईल. महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयात वस्त्रसहिता आहे, तर मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी का नाही असा प्रश्न देखील महाराष्ट्र मंदिर महासंघाने उपस्थित केला.
नागपुरातील चार मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू केल्यानंतर समितीने भाविकांसाठी पोस्टर लावले आहे. "अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच असात्विक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये. भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेशभूषेतच दर्शन घ्यावे", अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor