मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे यांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं.
घरीच आइसोलेट असताना रश्मी ठाकरे यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात हलवण्यात आलं. दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या आधी राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली होती. आदित्य ठाकरेंच्या संपर्कात असल्याने रश्मी ठाकरे यांचीही चाचणी करण्यात आली असताना त्या पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. नंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर त्या विलगीकरणात राहत होत्या.
रश्मी ठाकरे यांना खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी ११ मार्चला करोना लसीचा पहिला डोस घेतला होता.