Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई विमान तळावर 20 कोटी रूपयांचे कोकेन जप्त, दोन महिलांना एनसीबीने ताब्यात घेतले

cocaine
, मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (08:59 IST)
मुंबई : येथे एनसीबीने 20 कोटी रुपयांचे 2.800 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. बुटामध्ये लपवून कोकेनची तस्करी करणाऱ्या दोन महिलांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. मरिंडा एस असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. मरिंडा आणि आणखी एक महिला दक्षिण आफ्रिकेवरून आल्या होत्या.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या आकाराच्या 8 पॅकेटमधून हे कोकेन आणण्यात आले होते. यासाठी दोन जोड्यांच्या शूजमध्ये आणि दोन पर्समध्ये विशेष पोकळी तयार करून अतिशय काळजीपूर्वक हे कोकेन लपवले होते. मात्र, पोलिसांनी सतर्क राहून कोकेन तस्करीचा प्लान उधळून लावला आहे. मुंबई, गोवा आणि नजीकच्या भागामध्ये आगामी सणासुदीच्या काळात ड्रग्जचा पुरवठा करू इच्छिणाऱ्या स्थानिक ड्रग्ज तस्करांकडून याला जास्त मागणी आहे.
 
मुंबईतील एनसीबी अधिकार्‍यांना माहिती मिळाली की, 20 नोव्हेंबर रोजी इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा येथून मुंबईला एक विमान येणार आहे. यामधून कोकेनची तस्करी करण्यात येत आहे. मिलालेल्या माहितीनुसार मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ मुंबई विमानतळावर धाव घेत संबंधित महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला. अदीस अबाबाहून आलेले विमान मुंबई विमानतळावर पोहोचताच त्या महिलेला पोलिसांच्या पथकाकडून अडवण्यात आले. यावेळी तिची झडती घेण्यात आली. त्यानंतर तिच्या साहित्यामधून 2.800 किलो उत्तम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. हे कोकेन संशयास्पद वस्तूंमध्ये काळजीपूर्वक लपवून ठेवले होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दक्षिण आफ्रिकन महिलांची अधिक चौकशीत त्यांनी हे कोकेन मुंबईतील एच. मुसा या नायजेरियन नागरिकाला पुरवले जाणार असल्याचे सांगितले आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांची स्थानिक आणि ऑफशोअर देशांमध्ये असलेल्या किंगपिनबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे अशी माहिती मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी दिली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक ग्रामीण पोलिसांची ठिकठिकाणी धडक कारवाई; ६ लाखांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त, ८ गुन्हे दाखल