Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

20 जानेवारीपर्यंत 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार

20 जानेवारीपर्यंत 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरू होणार
, शनिवार, 9 जानेवारी 2021 (15:52 IST)
येत्या २० जानेवारीपर्यंत 50 % विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राज्यातील विद्यापीठातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी जाहीर केले. प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि इयर विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. 
 
50 % उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे उदय सामंत म्हणाले. प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे व सहायक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

COVID-19 New Strain: आता अमेरिकेत कोरोना विषाणूचे नवे वेरिएंट आढळले आहे, 50% अधिक संसर्गजन्य