भारतातील आर्थिक परिस्थितीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हिटलरशी तुलना अयोग्य ठरेल. कारण हिटलरच्या काळात जर्मनी हा देश आर्थिक महासत्ता बनला होता."
काही दिवसांपूर्वी क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची हिटलरशी तुलना केली होती. हाच धागा पकडत नितीन राऊत यांनी हे विधान केलं आहे
"काही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते 100 टक्के बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही," असं नितीन राऊत म्हणाले.