Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खेड रेल्वेस्थानकात चाकरमान्यांचा गोंधळ

खेड रेल्वेस्थानकात चाकरमान्यांचा गोंधळ
, गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:44 IST)
खेड:-परतीला निघालेल्या चाकरमान्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ा तिसऱया दिवशीही विक्रमी गर्दीने अन् विलंबाने धावल्या. मुंबईच्या दिशेने जाणाऱया रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमध्ये येथील स्थानकात तिष्ठत बसलेल्या प्रवाशांना प्रवेशच न मिळाल्याने गोंधळ घातला. राज्य राखीव दलाच्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी चाकरमान्यांची समजूत घातली. स्थानकात खोळंबलेल्या चाकरमान्यांना जामनगर व मंगला एक्स्प्रेस या जलद गाडय़ांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याने चाकरमानी शांत झाले.
 
गणरायाला निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीला निघाले आहेत. कोकण, मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी 300 हून अधिक फेऱया सोडून चाकरमान्यांच्या मार्गातील अडथळे दूर केले असले तरी सर्वच रेल्वेगाडय़ा गर्दीने धावल्या. परतीच्या प्रवासातही हिच परिस्थिती कायम असून येथील स्थानकात दाखल होणाऱया रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवेश मिळवताना गणेशभक्तांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. स्थानकात दाखल होणाऱया रेल्वेगाडय़ा आधीच हाऊसफुल्ल होवून येत असल्याने येथील स्थानकात आल्यावर गाडय़ांचे दरवाजेच उघडले जात नसल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महामार्गावरिल अपघातापैकी 29 टक्के अपघात महाराष्ट्रातून