नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घालत पोलीस भरती झाली पाहिजे अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्या लाठीचार्ज करावा लागला.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांना तरुणांच्या आक्रमक घोषणाबाजीचा सामना करावा लागला. या दरम्यान विद्यार्थ्यांनी फडणवीसांना घेराव घातला.