काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचावर हिंगोलीत अज्ञाताने हल्ला केला आहे. स्वतः आमदार प्रज्ञा सातव यांनी ट्विट करून ही माहिती दिली.हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे आमदार प्रज्ञा यांनी म्हटले आहे. राजकीय वर्तुळात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, आज कळमनुरी तालुक्यात कसबे दवंडागावाच्या दौऱ्यावर असताना, माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. माझे मुलं लहान आहे. आज माझे पती देखील हयातीत नाही. मी कधीच कोणाचे वाईट केले नाही. हा माझ्यावरील हल्ला नसून लोकशाहींवर केलेला हल्ला आहे. जरी माझ्यावर आज हल्ला झाला असला तरीही मी लोकांसाठी सतत काम करत राहीन . माझे पती राजीव भाऊंचे आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी आहेत . आपल्या इतिहासात सावित्रीबाई फुले , इंदिरागांधी सारख्या थोर महिलांवर देखील हल्ले झाले आहे. तरीही त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले आणि त्यात यशस्वी झाल्या. aj माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचा त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेत आमदार आहे. यांना काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती.प्रज्ञा सातव यांची निवड विधानपरिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध झाली.