राज्यात प्लास्टिक बंदी मोहिम राबविली जात असली तरी अनेक ठिकाणी सर्रास पद्धतीने प्लास्टिक विक्री केली जात असल्याचे दिसून येतेय.दरम्यान,जळगाव शहरात देखील अनेक विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा प्लास्टिक विक्रेत्यांवर जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई करत गेल्या सहा महिन्यात २६७ जणांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जळगाव मनपाच्या आरोग्य विभागातर्फे नुकतीच एका प्लास्टिकच्या होलसेल दुकानावर मोठी कारवाई करत तिथून तीन ट्रॅक्टर भरून प्लास्टिक जप्त करण्यात आले. मनपाने केलेल्या या कारवाईमुळे शहरात रितू प्लास्टिक विकण्यासाठी धजावत आहेत.प्लास्टिक वर महापालिकेने कारवाई केली यानंतर नागरिक धजावले ही गोष्ट जरी खरी असली तरी नागरिकांनी ही गोष्ट ध्यानी धरायला हवी की,प्लास्टिकमुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे व त्यासाठी आपण प्लास्टिक वापरायला नको.
शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक्के बंदी झाल्याचे चित्र गैरमार्गाने होत असलेल्या वापरावरून स्पष्ट होते. अनेकदा भाजीविक्रेते व अन्य व्यवसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून येत आहे.