तेंदू संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने (Tiger) हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे तर पती अद्यापही बेपत्ता आहे. मीना जांभुळकर असे मृतक महिलेचे नाव आहे. व विकास जांभुळकर तिच्या नवऱ्याचे आहे. ही घटना चिमुर तालुका येथे घडली.
सध्या तेंदू हंगाम सुरु असल्याने जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील केवाडा येथील विकास जांभुळकर आणि त्यांचा पत्नी मीना तेंदू संकलनासाठी जंगलात गेले होते. यावेळी त्यांच्यावर अचानक वाघाने हल्ला चढविला. या हल्यात मीना जांभुळकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विकास जांभुळकर अद्यापही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध घेत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. वन्यजीवांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात तेंदू हंगाम सुरू असल्याने तेंदुची पाने तोडायला मजूर मोठ्या प्रमाणात जंगलात जात आहेत. दरवर्षी तेंदू हंगामादरम्यान वाघाच्या हल्याच्या घटनेत मोठी वाढ होत असते.