Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ते’ जोडपं श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात !

'ते’ जोडपं श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात !
अहमदनगर , गुरूवार, 10 जून 2021 (08:15 IST)
सातारा येथून पळून आलेले एक अल्पवयीन जोडपे नागरिकांच्या मदतीने श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आता सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
 
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एका गावातुन अल्पवयीन तरुण तरुणीचे जोडपे दोन दिवसापूर्वी मुंबईला पळून गेले होते.
 
मुंबईला दादर भागात काही काळ थांबले व तेथून ते बसने थेट श्रीरामपूरला आले. येथे आल्यानंतर या अल्पवयीन जोडप्याला श्रीरामपूर शहराची माहिती नसल्याने ते शहरात इकडे-तिकडे फिरत होते.
 
दुपारच्या सुमारास हे जोडपे शहरातील बेलापूर रोड भागातील बजरंगनगर परिसरामध्ये फिरतांना दिसून आले. त्यानंतर पोलिसाना माहिती देत त्यांना श्रीरामपूर पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक श्री.समाधान सुरवडे, महिला पोलिस शिपाई टोपे यांच्या ताब्यात दिले.
 
त्यानंतर सातारा पोलिसांशी संपर्क करण्यात आला. त्यावेळीपोलिसांनी अधिक चौकशी केली असता असे समजले की,या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा कराड तालुक्यातील तळबीड पोलिस ठाण्यात दाखल आहे. मुलगी श्रीरामपूरला असल्याची माहीती समजल्यावर तात्काळ सातारा पोलीस श्रीरामपूरकडे निघाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ना. थोरात म्हणतात; शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी विधेयक आणू !