Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नारायण राणे, नितेश राणेंना 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

नारायण राणे, नितेश राणेंना 10 तारखेपर्यंत अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश
, शनिवार, 5 मार्च 2022 (08:43 IST)
दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात दिंडोशी न्यायालयाकडून या पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे.
 
10 मार्चपर्यंत दोघांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
 
याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस संबंधित ठाण्याच्या पोलिसांनी पाठवली आहे. मात्र, दिंडोशी न्यायालयाकडून त्यांना अंतरिम दिलासा मिळाला. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता.
 
त्यानंतर दिशा सालियानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Manipur Election Voting:मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी मतदान सुरू