अवघ्या महाराष्ट्रात पावसानं थैमान घातला आहे.राज्याच्या अनेक भागात महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळल्याने अनेक लोक मृत्यूमुखी झाले आहे.बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्यावर लोकांनी सुटकेचा श्वास घेत असताना हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा देऊन रायगड, रत्नागिरी, पुणे,कोल्हापूर,सिंधुदुर्ग ,साताऱ्यात पावसाचा जोर वाढून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांवर पुन्हा पावसाचं संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे या पूर्वी राज्यात कोकण,मराठवाड्यात,पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली.आता या जिल्ह्यात पुन्हा पावसाचे जोर वाढून या 30 जुलै पर्यंत जोरदार अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.त्या मुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही पूरग्रस्त विभागात आज आणि उद्या पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. पुणे,कोल्हापूर,रत्नागिरी,रायगड, सातारा,सिंधुदुर्ग ठाणे या काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढून ऑरेंज अलर्ट सांगण्यात आला आहे.