Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील या नदीत आहेत मगर, बारा वर्षाच्या मुलाला नेले ओढून

राज्यातील या नदीत आहेत मगर, बारा वर्षाच्या मुलाला नेले ओढून
, शुक्रवार, 17 मे 2019 (09:57 IST)
आपणं सर्व डिस्कवरी किंवा अन्य प्राणी जगत सबंधी वाहिनीवर एपिसोड्स पाहतो. त्यात नदीतील मगर नेहमी दाखवली जाते. मात्र आपल्या राज्यात देखील अनेक ठिकाणी या मगरी असून त्यांना इंडियन क्रोकोडाईल असे म्हणतात. मात्र ही मगर आता एका बारा वर्षाच्या मुलाच्या जीवाशी आली आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर बसलेल्या मुलाला मगरीने पाण्यात ओढले असून. मौजे डिग्रज गावात हा प्रकार घडला आहे. आकाश मारुती जाधव असं या 12 वर्षीय मुलाचं नाव असून, आकाशची बहीण नदीच्या काठावर कपडे धूत होती. त्यावेळी आकाश पाण्याच्या जवळ बसला असताना मगरीने अचानक हल्ला केला आणि त्याला पाण्यात ओढल होते. 
 
मगर आकाशच्या शरीराला एक तास तोंडामध्ये घेऊन पाण्यात फिरत होती. जसे ती शिकारी सोबत करते तसी तिने त्या बालकासोबत केले. या बद्दल  माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली. गावकरी आणि वन विभागाकडून मुलाचा युद्धपातळीवर शोध घेण्यात आला. पण त्याला शोधण्यात अजूनही यश आलेलं नाही. आकाशचे वडील नदी किनारी असलेल्या विटभट्टीवर काम करतात. सध्या मगरींचा प्रणयकाळ सुरु असून अनेक मोठ्या मगरी या उथळ पाण्यात आल्या आहेत, त्यामुळे नदी काठी मोठा धोका आहे. आकाशला शोधण्याचे काम अजूनही सुरु आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाणे मनपावर धडकणार शेतकरी आणि राज ठाकरे, महामोर्चाचे कारण काय ?