Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतकरी चिंतेत

cyclone
, रविवार, 5 मार्च 2023 (15:36 IST)
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 5 ते 7 मार्च दरम्यान नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यात बुलढाणा येथे शनिवारी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे हवामान थंड झाले असून रबीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. या मुळे शेतकरी चिंतेत आला आहे. 

राज्यातील नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक  ठिकाणी  पावसाच्या  सरी बरसल्या आहेत. अवकाळी पावसामुळे गहू, हरबरा, मका , फळे पालेभाज्या ,आंबा ची पिकांना फटका बसून शेतकरी चिंतेत आहे. हवामान बदलाचा शेतपिकांवर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्याने वर्तवली आहे. 

येत्या 5 ते 7 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या अवकाळी पावसाचा फटका मालेगाव, सटाणा भागात , कळवणच्या पश्चिम पट्ट्यात, चनकापूर, अंबुर्डी, बोरदैवत भागात आंबा, हरबरा, गहू, वाटाणा ,कांदा आणि मसूरच्या पिकाला बसला असून नाशिक भागात द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे.    
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WPL 2023:आज यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सचे संघ आमनेसामने