कोयना धरणात पाणीसाठा ८९ tmc झाला होता. त्यामुळे सहा वक्रद्वारे प्रत्येकी २ फूट उघडून कोयना नदीपात्रात सांडव्यावरून ११४२७ क्यूसेस विसर्ग सोडण्यात आले आहे. कोयना पायथा विजगृहातून सुरू असलेला २१ क्यूसेस विसर्ग धरून कोयना धरणातून एकूण विसर्ग cusecs१३५२७ क्यूसेस आहे. सदर विसर्ग पाण्याची आवक व पावसाची तीव्रता पाहून कमी किंवा जास्त करणेत येईल. विसर्गात होणारा बदल अवगत करण्यात येईल. नदी काठच्या लोकांनी सालधानता बाळगावी, वहात्या पाण्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करु नये. असे अवाहन प्रशाससनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या राज्यात आणि अनेक जिल्ह्यात जोरदार पाउस सुरु असून मुंबई सह अनेक ठिकाणी गेले सात दिवस न थांबता पाउस सुरु सुरु आहे. त्यामुळे अंबेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे.