Publish Date: Sat, 03 Aug 2019 (16:20 IST)
Updated Date: Sat, 03 Aug 2019 (16:21 IST)
मुंबईतील चेंबूर भागातल्या आरती तापसे ( १८) या मुलीने वडिल ओरडल्याने टोकाचे पाऊल उचलत इमारतीच्या ६व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. चेंबूरमधील म्हाडा कॉलनी भागातील ही घटना आहे. ही मुलगी ब्यूटी पार्लरमध्ये काम करत होती. रात्री घरी उशिरा आल्याने वडिल या मुलीला ओरडले. त्याच रागात तिने आत्महत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या मुलीच्या आत्महत्येचा थरार कैद झाला आहे. या घटनेनंतर मुलीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.