Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दादा भुसे ठाकरे गटाच्या माजी आमदाराच्या भेटीला ; दोघांत तासभर चर्चा..!

dada bhuse
, शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (20:22 IST)
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. नाशिकमध्ये शिंदे गटात जोरदार इनकॅमिंग झाली तर ठाकरे गटाला भगदाड पडले अशात नाशिकच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एक मोठी बातमी समोर येत आहे. शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदाराच्या घरी जात त्यांची भेट घेतली आहे.
 
पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर येथील ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतली आहे. बंद दाराआड दादा भुसे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झाली आहे. त्यांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट कशासाठी आणि का असावी याचे वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत.
 
सिन्नर अपघातातील जखमींची विचारपूस करून दादा भुसे थेट राजाभाऊ वाजे यांच्याकडे दाखल झाले होते. आज सिन्नर येथे झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू तर १८ ते २० जण जखमी झाले आहेत. दरम्याननाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी लगेचच राजाभाऊ वाजे यांच्याकडे प्रस्थान केले.
 
दरम्यान बंद दारा आड दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी ? राजाभाऊ वाजे शिंदे गटात जाणार का ? दादा भुसे यांच्या सिन्नर मधील डिनर डिप्लोमसी मागे हेतू काय ? याकडे लक्ष लागून आहे.
 
ठाकरे गटाला धक्के पे धक्का असे धक्कातंत्र वापरण्यास शिंदे गट यशस्वी ठरला. ठाकरे गटाच्या अनेक विश्वासू नेत्यांनी त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागली आहे. कालच माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माजी मंत्री आणि माजी आमदार घोलप पिता पुत्र यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे त्यांच्याच मुलीने शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारीचे ग्रीन सिग्नल दिले. अशात आज पालकमंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या झालेल्या भेटीमागे काय दडलं आहे..? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उर्फीच्या पोस्टला चित्रा वाघ यांचे उत्तर..!