Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबो! राज्यातील 7800 शिक्षक बोगस, शिक्षण विभागात खळबळ

बाबो! राज्यातील 7800 शिक्षक बोगस, शिक्षण विभागात खळबळ
, शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (13:47 IST)
राज्यात तब्बल 7800 शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या पूर्वी राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा होत असल्याची बातमी मिळाल्यामुळे खळबळ उडाली होती. आता महाराष्ट्र शिक्षक पात्रतेच्या 2021 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीना पैसे घेऊन पास करून शिक्षक पदावर घेतल्याची धक्कादायक बातमी आली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पुणे सायबर पोलिसांच्या तपासणीत उघडकीस झाले. टीईटी च्या परीक्षेत अपात्र झालेल्या 7800 परीक्षार्थी कडून 50 ते 60 हजार रुपये  घेऊन त्यांना उत्तीर्ण केले आहे. या बाबत पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला.  
 
राज्य परीक्षा परिषद कडून आलेल्या मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेल्या निकालाची पडताळणी सायबर पोलिसांकडून करण्यात आली. 2018 आणि 2019 मध्ये टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले. 2019 -20 च्या परीक्षेच्या निकालात एकूण 16,592 जण पात्र असल्याचे सांगितले होते. पुणे सायबर पोलिसांनी तपास केल्यावर तब्बल 7800 परीक्षार्थी अपात्र असल्याचे उघडकीस आले. हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे
शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बलात्कारानंतर महिलेचे केस कापले, चप्पलचा हार घालून रस्त्यावर फिरवले