Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

कार्तिक पौर्णिमेला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात 51 हजार दिव्यांची आरास

Dagdusheth Ganapati temple
, सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (10:02 IST)
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते कळसापर्यंत 51 हजार दिव्यांची सजावट करण्यात आली. दरवर्षी मोठया प्रमाणात होणारा अन्नकोट या पद्धतीने साजरा करण्यात आला. 
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आणि साध्या पद्धतीने अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. परिसरात दिव्यांच्या प्रकाशामुळे दगडूशेठ गणपती मंदिर तसेच बाजूचा परिसर उजळून निघाला. याशिवाय तोरण, फुले, रांगोळ्यांनीदेखील मंदिराचा परिसर सजविण्यात आला.
 
श्री गणेशाला फळ-भाज्यांसह मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा निवडक पदार्थांचा अन्नकोट देण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Farmers Protest Live : शेतकर्‍यांनी दिल्लीला सील करण्याची धमकी दिली, सरकारची पुढील योजना काय असेल?