Publish Date: Sat, 28 Nov 2020 (17:57 IST)
Updated Date: Sat, 28 Nov 2020 (16:52 IST)
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर फडणवीस यांनी अत्यंत शांतपणे दिलं. मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल अशी भूमिका फडणवीसांनी स्पष्ट केली.
ते म्हणाले, 'कोणी आमच्या घरच्यांवर टीका करत नाही अशातला भाग नाही. शिवसेनेचे अधिकृत नेते माझ्या पत्नी संदर्भात काय लिहितात, बोलतात, ट्विट करतात हे सर्वांना माहित आहे. पण मी त्या गोष्टीचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल.' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.