Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

हे तर पलटूराज सरकार आहे : फडणवीस

Palturaj government
, बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (17:04 IST)
राज्य सरकार रोज घोषणा करते आणि मागे घेते. पलटूराज सरकार आहे. वर्षभर बदल्या करा, आणि माल कमवा, हे धोरण अवलंबले आहे. सगळीकडे बदल्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे केली.
 
 '' फडणवीस म्हणाले, ''2002 चा अपवाद वगळता पुणे हा पदवीधर मतदार संघ भाजपचा गड होता. तो राखायचा आहे. कोविडचे आव्हान देशासमोर उभे राहिले असताना, राजकीय पक्ष पंतप्रधान मोदी याना नावे ठेवायचे. मात्र, पंतप्रधान सामान्य माणसांची यांची चिंता करीत होते. आत्मनिर्भर भारत सुकर जीवन केले. राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही. समृद्ध राज्याने तुम्ही तूमच्या, आम्ही आमच्या घरी सुखरूप रहा एवढेच सांगितले. ही दुर्दैवी बाब आहे. मदत करायची सोडून न वापरलेल्या विजेचे भरमसाठ बिल दिले. दोन खोल्यासाठी २० हजार बिल आले होते. वीज वापरलीच नाही तर बिल का भरावे. जी बिले वाढीव आहेत. त्याला आमचा विरोध आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचवली