मागील दोन महिन्यांपासून डहाणूत भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले असून, दिवभरात सात तासांमध्ये पाचवेळा भूकंप झाले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, अशी भिती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.या भूकंप मालिकेत सर्वात मोठा धक्का हा ४.८ रिश्टर स्केलचा होता तर धक्क्यामुळे अनेक घरांना तडे देखील गेलेत. जिल्हा परिषदेच्या शाळा सोडण्यात आल्या असून या भूकंपाचे हादरे तलासरीपर्यंत जाणवल्याने भितीचे वातावरण पसरले असून, डहाणू, तलासरी तर पुन्हा एकदा भूकंप जाणवला आहे. सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी पहिला धक्का बसला, त्यानंतर सकाळी १०.०३ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तर १० वाजून २९ मिनिटांनी पुन्हा एकदा ३ रिश्टर स्केलचा हादरा जाणवला आहे. दुपारी २ वाजून ५ मिनिटांनीही ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हे भूकंपाचे धक्के धुंदलवाडी, चिंचले, पारडी, हळदपाडा, आंबोली, सासवद येथील घरांना मोठे तडे गेले आहात. तर भूकंप झाल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून, जिल्हा परिषदेच्या शाळा देखील सोडली आहे. तर या धक्क्याने अनेकांच्या घरातील भांडी देखील पडली आहेत. यामुळे डहाणूत भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच या भूकंपाचा केंद्रबिंदू धुंदलवाडी असल्याने स्थानिकांनी घरांना कुलूप लावून स्थलांतर केलं आहे.