Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर, सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार

voting machine
, शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (19:04 IST)
पावसाचे  प्रमाण कमी असलेल्या विविध 51तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. या मध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण मधील 22 , दिंडोरीतील  50 आणि नाशिक तालुक्यातील 17 ग्राम पंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.  17 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.
 
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
 
त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य विवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. 
 
घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार18 ऑगस्ट2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
 
नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 सप्टेंबर 2022रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत, अशीही माहिती मदान यांनी दिली.
 
जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या -
नंदुरबार: शहादा- 74 व नंदुरबार- 75.
धुळे: शिरपूर- 33. जळगाव: चोपडा- 11 व यावल- 2.
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 1, संग्रामपूर- 1, नांदुरा- 1, चिखली-3 व लोणार- 2.
अकोला: अकोट- 7 व बाळापूर-1. वाशीम: कारंजा- 4.
अमरावती: धारणी-1, तिवसा-4, अमरावती-1 व चांदुर रेल्वे- 1.
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरगाव- 11 व झरी जामणी- 8. नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर-1, मुदखेड- 3, नायगाव (खैरगाव)- 4, लोहा- 5, कंधार-4, मुखेड- 5 व देगलूर- 1
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 6.
परभणी: जिंतूर- 1 व पालम- 4. नाशिक: कळवण-22, दिंडोरी- 50 व नाशिक- 17.
पुणे: जुन्नर-38, आंबेगाव- 18, खेड- 5 व भोर- 2.
अहमदनगर: अकोले- 45.
लातूर: अहमदपूर- 1.
सातारा: वाई- 1 व सातारा-8. व
कोल्हापूर: कागल- 1.
एकूण: 608 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ZIM: टीम इंडियात मोठा बदल, कॅप्टन शिखर धवनला उपकर्णधारपदाची कमान