Publish Date: Mon, 25 Mar 2019 (17:25 IST)
Updated Date: Mon, 25 Mar 2019 (17:46 IST)
कोल्हापुरात रंगपंचमी खेळून राजाराम तलावात अंघोळीसाठी गेलेल्या एका तेवीस वर्षीय तरूणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. सोमवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
रंगपंचमी खेळून हा तरूण राजाराम तलाव येथे आपल्या मित्रासोबत अंघोळीसाठी गेला होता. यावेळी पोहताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.