Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गव्हाच्या पिठात पडून 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

baby legs
, रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (14:00 IST)
घरात लहान चिमुकले खेळत असताना त्यांच्यावर बारीक लक्ष देणं आवश्यक आहे.लहान मुलं खेळताना काय करतील काहीही सांगता येत नाही. कधी कधी खेळताना लहानगे असं काही करतात की त्यांच्यासाठी जीवावर बेतते. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात वडणगे येथे यमनगर कुटुंबात हृदय द्रावक घटना शुक्रवारी घडली आहे. 
यम नगर कुटुंबातील 9 महिन्यांच्या चिमुकल्याचा गव्हाच्या पिठात पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. कृष्णराज राजाराम यमनगर असे या मृत बालकाचे नाव आहे. 

कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रिया राजाराम यमगर या आपला नऊ महिन्याचा मुलगा कृष्णराज याला घेऊन करवीर तालुक्यातील वडणगे येथे आपल्या आजीकडे आल्या होत्या. मृत कृष्णराज हा घरात वॉकर मध्ये बसून इकडे तिकडे फिरत होता. तोल जाऊन तो गव्हाच्या पिठाच्या घमेल्यात जाऊन पडला आणि रडू लागला. त्याच्या नाकातोंडात गव्हाचं पीठ गेल्याने त्याच्या श्वास गुदमरू लागला त्याच्या श्वास नलिकेत पीठ गेल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कृष्णराजच्या निधनाने कुटुंबियांने हंबरडा फोडला. चिमुकल्या कृष्णराजच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे 
  Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Petrol Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, आजचे दर जाणून घ्या