तुळजापूर येथील कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चुकीच्या वैद्यकीय सेवा दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मुलीच्या मृत्यूनंतर डॉक्टरसह रूग्णालयावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आला.
तुळजापूर येथील कुतवळ रुग्णालयात 18 वर्षीय प्रतीक्षा प्रकाश पुणेकर या मुलीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. हा मृत्यू चुकीच्या वैद्यकीय सेवा दिल्याने झाल्याचा आरोप करीत डॉ.दिग्विजय कुतवळ यांच्यावर गुन्हा नोंद करून वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करीत कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार केलेल्या शिफारशीनुसार परवाना रद्द केला आहे.डॉक्टर वरती तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत होती.
अखेर या कुटूंबियाला न्याय मिळाला आहे.तुळजापूर येथील कुतवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन परवाना रद्द करण्यात आलाय.याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय केशव पाटील यांनी काढले आहेत. एका रुग्णाला चुकीची वैद्यकीय सेवा दिल्याने ही कारवाई करण्यात आलीय.