Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परीक्षा देताना दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

webdunia
मंगळवार, 24 जानेवारी 2023 (13:15 IST)
बाभुळगावच्या सरूळ येथील प्रताप विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सराव परीक्षा देताना फिट येऊन कोसळून दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रतीक गजानन थोटे असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

इयत्ता दहावीत शिकणारा प्रतीक हा नेहमीप्रमाणे सोमवारी शाळेत आला आणि सराव परीक्षा देत असताना दुपारी चारच्या सुमारास  अचानक त्याला फिट आली आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तातडीनं शिक्षकांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अकाली त्याच्या अशा एक्झिटने 
हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
प्रतीक हा अभ्यासात आणि खेळात खूप हुशार होता. त्याने खो- खो खेळात प्रथम क्रमांक पटकावला होताच. त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी शस्त्र क्रिया करण्यात आली होती. त्याचा प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याने अशा प्रकारे जगाला निरोप दिल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण मंडळाचे सचिव मुख्याध्यापकांनी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांना आधार दिला. आपल्या मित्राला शेवटचे बघण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.शाळेत प्रतीकच्या निधनाने शोककळा पसरली आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Republic Day offers: प्रजासत्ताक दिनासाठी विविध ऑफर ,स्मार्ट टीव्ही ते लॅपटॉप आणि वॉशिंग मशीनवर 45% सूट