Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लातूर जिह्यात पीक खराब झाल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

लातूर जिह्यात पीक खराब झाल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
, मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:57 IST)
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका24 वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे पीक खराब झाल्यामुळे बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
 
ही घटना शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या डोंगरगाव गावात घडली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अजित विक्रम बान असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
 
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या शेतकऱ्याकडे चार एकर जमीन होती, मात्र, मराठवाड्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी नैराश्यात  होता. त्यांनी बियाणे घेण्यासाठी हजारो रुपये खर्च केले होते आणि बँकांकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने जिल्हा अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांना पत्र लिहून त्याच्या नुकसान झालेल्या पिकाची भरपाई देण्याची मागणी केली होती, कारण त्याला फक्त 7,000 रुपये मदत मिळाली होती.
 
त्याने बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .अजितच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी आहे.या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाळेबंदीनंतर राज्यात प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार करोनाचे नियम पाळून पंढरीच्या कार्तिकी यात्रेला परवानगी