Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपक दिवेचा खून झाल्याचे स्पष्ट; मित्राविरोधात गुन्हा दाखल

murder
, शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (08:29 IST)
नाशिक – बेपत्ता झालेल्या दीपक दिवे गोदापात्रात काल मृतदेह सापडल्यानंतर आज शवविच्छेदन करण्यात आले. यात दिवेचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात दिवे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याचे तसेच गळा आवळण्यात आल्याच्या खूना आढळून आल्याने या खूनाचा उलगडा झाला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी आत्महत्या करणा-या त्याचा मित्र विजय जाधव याच्या विरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
मृत दीपक दिवे मागील आठवडयात बुधवारी (दि.९) गोदापात्र भागात मित्रांसमवेत मद्यपान करीत असतांना अचानक फोन आल्याने उठून गेला तो घरी परतलाच नाही. तो बेपत्ता असल्याने याबाबत त्याच्या पत्नीने गंगापूर पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी दिवे याच्या पत्नीने विजय जाधव याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी विजय जाधव सह अन्य मित्रांची चौकशी करून दिवेचा शोध घेतला जात होता. रविवारी विजय जाधव यास दुस-यांदा चौकशीसाठी बोलविण्यात आले असता त्याने विषारी औषध सेवन केले असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत काही दिवस उलटत नाही तोच बेपत्ता असलेला दीपक दिवे याचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह बुधवारी सायंकाळी पोलिसांना मिळून आला. एकापाठोपाठ दोघा मित्रांच्या मृत्यूने खळबळ उडालेली असतांना गुरुवारी शवविच्छेदन अहवालात दिवेच्या डोक्याला गंभीर दुखापत तसेच गळा दाबल्याच्या खुना असल्याचे आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या सर्व पार्श्वभूमीवर गंगापूर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी विजय जाधव याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर