Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेमकं काय म्हटले आहे व्हिडीओमध्ये?

devendra fadnavis
, गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (22:00 IST)
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना फडणवीसांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा बाळासाहेबांना भेटलो होतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केले.
 
नेमकं काय म्हटले आहे व्हिडीओमध्ये?
 
या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस  म्हणाले, मला आठवतं आहे की मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो तेव्हा आमदारांची एक बैठक व्हायची. त्यात बाळासाहेब बोलायचे आणि त्यातून आमदारांचा जो काही जोर चढायचा ते मी स्वतः अनुभवलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करंट होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक समोरच्या माणसामध्ये तो करंट जायचा. त्यातून त्या माणसालाही तो पेटवायचा. ही जी काही एक प्रचंड अशा प्रकारची नेतृत्वक्षमता त्यांच्याकडे होती. एकीकडे वज्राहून कडक अशा प्रकारची भूमिका मांडणारे बाळासाहेब होते. तर दुसरीकडे विशाल जलाशयाप्रमाणे किंवा निर्झर झऱ्यासारखे प्रेम करणारेही बाळासाहेब होते. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो आणि ज्या विचारांनी त्यांनी आजन्म कार्य केले त्या विचारांनी आणि त्याच गतीने आम्ही काम करत राहू.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्राचे वाचन करत आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका