rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरण, एम एस रेड्डी यांना अखेर निलंबित

Deepali Chavan's suicide case
, मंगळवार, 30 मार्च 2021 (20:27 IST)
मेळघाटमधील वनरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम एस रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती एएनआयने दिली आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये रेड्डी यांचं देखील नाव असून त्याच आधारावर रेड्डी यांना निलंबित करण्यात आलं आहे. दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी मेळघाटमध्येच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्तापर्यंत या प्रकरणात विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये विनोद शिवकुमार याने छळ केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तो' प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारनं फेटाळला