Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक- उध्दव ठाकरे

uddhav thackeray
, मंगळवार, 11 जुलै 2023 (07:31 IST)
Devendra Fadnavis is a stain on Nagpur -Uddhav Thackeray उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हालत सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही अशी झाली आहे.फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे अशा शब्दांत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. आज ते नागपुरात बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली. सभेच्या सुरुवातीला काहीवेळ सभेत गोंधळ झाल्यानंतर उध्दव ठाकरे मात्र संतापले.
 
यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, अंबादास दानवेंनी मला सांगितंल की, नागपुरमध्ये गावठी कट्टा गहाण टाकून पैसे दिले जातात. माझ्या शेतकऱ्याला जर कर्ज पाहिजे असेल तर त्याला आपलं जमीन, घर आणि पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं. पण इथं गावठी कट्ट्यावर पैसे देणारी अवलाद नागपूरमध्ये गृहमंत्र्यांच्या गावात असा  निशाणा भाजपवर साधला.
 
एकनाथ शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, आपल्यासोबत बसले होते ते अचानक त्यांच्यासोबत गेले.कालपर्यंत त्यांना शिव्या देत होते आज त्यांच्यासोबत गेले, आता अचानक विकास पुरुष झालेत. हा त्यांचा स्वतःचा विकास होतोय, असा टोला यावेळी बंडखोरांना लगावला. यावेळी फडणवीसाचं वक्तव्य ठाकरेंनी ऐकवल. यावेळी हशा पिकला. राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही नाही याचा अर्थ हो-हो- हो असाच आहे. 2014 ला हिंदुत्वाच्या पायावर भाजपने कुऱ्हाड मारली. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दया येते. वार करणारी औलाद तुमची आहे आमची नाही, असा ही टोला लगावाल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्रंबकेश्वरमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी देतात उघड्या छपराखाली सेवा; कोसळणाऱ्या पावासाचा सेवेत येतो व्यत्यय